Ad will apear here
Next
‘कोर्टाचा निकाल ‘कॉन्टिनेन्टल’च्या बाजूने’
पुणे : दिवंगत साहित्यिक शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या मृत्युंजय, छावा आणि युगंधर या कादंबऱ्यांच्या प्रकाशनावरून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नेमलेल्या ‘लवाद मंडळाने (Arbitration Tribunal Court) संपूर्ण केसचा ऊहापोह करून पावणेचार वर्षांनंतर अंतिम निर्णय कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या बाजूने दिला आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे ऋतुपर्ण अनिरुद्ध कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 

‘लवाद मंडळाने दिलेल्या निकालानुसार, शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या उपरोल्लेलिखित पुस्तकांचे मराठी प्रकाशनाचे सर्व अधिकार स्वामित्व अधिकार संपेपर्यंत कॉन्टिनेन्टल प्रकाशनाकडेच राहतील. ‘कॉन्टिनेन्टल’खेरीज अन्य कोणत्याही प्रकाशकाला हे साहित्य प्रकाशित आणि वितरित करता येणार नाही. शिवाजी सावंत यांच्या वारसांनाही ही पुस्तके अन्य प्रकाशनामार्फत मुद्रित करण्यास अगर विक्री करण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यात आला आहे,’ अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. 

‘कोर्टाच्या निर्णयानुसार पुस्तक विक्रेत्यांनाही संबंधित पुस्तके कॉन्टिनेन्टल प्रकाशनाव्यतिरिक्त अन्य कोणाकडूनही विक्रीसाठी घेता येणार नाहीत. तसे केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल,’ असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

‘गैरमार्गाने प्रसिद्ध केलेल्या प्रती काही विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत. अशांवर पूर्वीप्रमाणेच कायदेशीर कारवाई केली जाईल. आम्हाला मिळालेला वारसा आम्ही सक्षमपणे पेलूच; शिवाय पुढेही उत्तमोत्तम साहित्य प्रकाशित करून लोकांपर्यंत पोहोचवत राहू,’ अशी ग्वाहीही कुलकर्णी यांनी दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZZLBJ
Similar Posts
थंडी पुण्यातील पत्रकार आणि लेखक श्रीपाद ब्रह्मे यांचं ‘टी-टाइम’ हे पुस्तक आज (२५ नोव्हेंबर) कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. ‘बुकगंगा’तर्फे त्याचं ई-बुकही येत आहे. ब्रह्मे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये सलग चार वर्षं ‘टी-टाइम’ हे साप्ताहिक सदर लिहिलं. हलक्या-फुलक्या शैलीतलं, अनेकांच्या मनातल्या
‘चित्रपटसृष्टी गाजवलेल्या कलाकारांवर अभ्यासपूर्ण लेखन आवश्यक’ पुणे : ‘चित्रपटसृष्टी गाजवलेल्या दिग्गज कलाकारांबाबत अभ्यासू पत्रकारांनी, अभ्यासकांनी अभ्यासपूर्ण लेखन करावे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ सिनेअभ्यासक आणि लेखिका सुलभा तेरणीकर यांनी व्यक्त केली. दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रिन्स चार्मिंग’ या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन त्यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात झाले
‘मी संपादक-प्रकाशकांचा लेखक’ पुणे : ‘मी दिग्दर्शकाचा नट आहे, तसाच संपादक-प्रकाशकांचा लेखक आहे. माझ्यातला लेखक आणि अभिनेता स्वतःला व्यक्त करण्याच्या ऊर्मीतून बाहेर पडला. कधी तो लेखक म्हणून बाहेर पडतो, तर कधी अभिनेता म्हणून पण तरीही अभिनय क्षेत्रातल्या कामाच्या व्यग्रतेमुळे लेखक थोडा मागे राहिला,’ असे मनोगत ज्येष्ठ अभिनेते आणि संवेदनशील
माहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य पुणे : ‘मराठी भाषा व साहित्याचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची ओरड एकीकडे सुरू आहे; मात्र माहिती-तंत्रज्ञानाच्या साह्याने मराठीची अस्मिता जपणे, तिचे अस्तित्व टिकविणे याबरोबरच मराठीचे संवर्धन करणेही शक्य आहे. तंत्रज्ञानात वेगात प्रगती होत असून, मराठी माणसाने मराठीचा वापर बोलताना, तसेच संगणक व मोबाइल फोनवरही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language